
दापोली परिसरात परत भूकंप सदृश्य धक्का
गेले काही दिवस दापोली परिसरात भूकंप सदृश्य धक्क्याचे गूढ अजूनही सुटलेले नाही असे असताना परत सकाळी एकदा भूकंप सदृश्य धक्का नागरिकांना जाणवला. हे धक्के नेमके कशामुळे जाणवत आहेत हे कळले नाही.यापूर्वी शासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली होती.त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. मात्र या परिसरात गेलची गॅस पाईप लाईन गेलेली आहे त्या ठिकाणी धक्के जाणवत आहेत.
www.konkantoday.com