डॉ. विवेक भिडे यांचा भाजपमध्ये सक्रिय सहभाग
रत्नागिरी-ज्येष्ठ आंबा बागायतदार आणि गणपतीपुळे देवस्थानचे डॉ. विवेक भिडे यांनी भाजपमध्ये सक्रिय प्रवेश केला. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी त्यांचे भाजप कार्यालयात आयोजित एका कार्यक्रमात स्वागत केले. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांच्यासह अशोक मयेकर, विलास पाटणे, अॅड. बाबा परुळेकर आदी उपस्थित होते.
डॉ. भिडे हे अभ्यासू व्यक्तीमत्व असून त्यांचा आंबा, पर्यटन या विषयात हातखंडा आहे. आंबा उत्पादकांची संघटना बांधण्यासाठी ते सक्रिय आहेत. आता त्यांनी भाजपच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात एंट्री केली असून आंबा बागायतदारांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते निश्चितच प्रयत्न करणार आहेत. गणपतीपुळे हे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असून या माध्यमातून पर्यटन विकास करण्याकरिता त्यांचे प्रयत्न आहेत. केंद्रात नरेंद्र मोदी सरकार प्रचंड मतांनी विजयी झाले. आता महाराष्ट्रातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार विजयी होईल, असा विश्वास अॅड. पटवर्धन यांनी व्यक्त केला. त्यामुळे कोकणातील अनेक अभ्यासू व्यक्तीमत्व भाजपमध्ये दाखल होत असून त्याचा फायदा कोकणवासीयांना होईल, असेही ते म्हणाले.
www.konkantoday.com