बेकायदा दारू वाहतूक करणार्या आरामबसवर बांदा पोलिसांनी केली कारवाई
गोव्याहून- अलिबागकडे बेकायदा दारू वाहतूक करणार्या रामेश्वर या खासगी आराम बसवर बांदा पोलिसांनी कारवाई केली आहे.या कारवाईत १ लाख ६५ हजार ४११ रुपयांच्या दारुसह एकूण १३ लाख ६५ हजार ४११ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.गोव्यातून येणारी खासगी आरामबस (एमएच ४८ बीएम २१२१) तपासणीसाठी थांबविण्यात आली असता पोलिसांना मुद्देमाल बसमध्ये सापडला.या प्रकरणी बसचालक तसेच क्लिनर सह अन्य १७ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
www.konkantoday.com