
शिवसैनिकांनो, वाघांनो.. एकजुट व्हा! महाराष्ट्राच्या विकासाला गतीशील बनवा!महाराष्ट्र सदनाबाहेर एक भावनिक होर्डिंग
शिवसेना पक्षाचे दोन गटात विभाजन झाल्यानंतर राज्यातील शिवसैनिकांची अवस्था ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ अशी झाली आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे.दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता सध्या तरी राजकीय वर्तुळात वर्तवण्याचं करण्याचं धाडस कोणीही करत नाहीये. शिवसेनेचे दोन गट पडल्याने त्याचा फटका लोकसभा निवडणुकीतही बसला आहे. शिंदेंच्या तुलनेत ठाकरेंना चांगले यश मिळाले अशीही चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आणि केंद्रात सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसैनिक आपल्या भावना व्यक्त करत आहेत. महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांच्या वतीने नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनाबाहेर एक भावनिक होर्डिंग लावण्यात आले आहे. हे होर्डिंग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या बॅनरवर महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांच्या भावना या होर्डिंगवर दिसत आहेत. या होर्डिंगच्या माध्यमातून सर्व शिवसैनिक आणि नेत्यांना पुन्हा एकदा एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यावर मोठ्या अक्षरात “शिवसैनिकांनो, वाघांनो.. एकजुट व्हा! महाराष्ट्राच्या विकासाला गतीशील बनवा! आपल्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा” असे लिगिले आहे. तसेच खाली शुभेच्छुक म्हणून महाराष्ट्रातील कोट्यवधी शिवसेना प्रेमी असे लिहिले आहे. या पोस्टरची सध्या दिल्लीत चांगलीच चर्चा रंगली आहे.
www.konkantoday.com