नाणार प्रकल्प आता सर्वांनी विसरा-उद्योगमंत्री ना.सुभाष देसाई
राजापूर तालुक्यातील बहुचर्चित नाणार रिफायनरी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होणार नाही व तो सर्वांनी विसरावा असे उद्योगमंत्री ना.सुभाष देसाई यांनी सांगितले.नाणार रिफायनरी प्रकल्प व्हावा यासाठी काहींनी पुढाकार घेतला असून पाठिंब्याचे निवेदन देण्यात आले आहेत.स्थानिकांनी रिफायनरीसाठी आवश्यक असलेली जागा देण्याची तयारी दर्शवली आहे.तरी अनेकांचा विरोध कायम असल्याने नाणार रिफायनरी प्रकल्प सर्वांनी विसरावा अशी भूमिका ना. देसाई यांनी मांडली.महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नामदार देसाई हे रत्नागिरी जिल्हा दौऱयावर आले होते.एकीकडे मुख्यमंत्र्यांनी नाणार प्रकल्प समर्थकांशी चर्चा करण्याची घोषणा केली असतानाच दुसरीकडे शिवसेनेच्या उद्योगमंत्र्यांनी प्रकल्प विसरावा असा दावा केल्याने नाणार होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
www.konkantoday.com