
ग्रामस्थांच्या जागरूकतेमुळे पशु बाळीचा प्रकार उधळून लावण्यात यश
अंधश्रद्धेपोटी पशु बळी देण्याचे अनेक प्रकार आपण ऐकत आसतो.असाच एक प्रकार रत्नागिरी तालुक्यातील भंडारपुळे परिसरात एका निर्जनस्थळी मंदिराजवळ ग्रामस्थांनी उधळून लावला.भंडारपुळे परिसरात निर्जन स्थळी असलेल्या मंदिरानजीक पशुबळी देण्यासाठी एक रेडा आणला होता आणि या रेडय़ाचा बळी देण्यात येणार होता.मंदिरापाशी रेडय़ाचा बळी दिला जाणार याची माहिती ग्रामस्थांना आधीच मिळाली होती.या माहितीवरून ग्रामस्थांनी सापाळा रचुन लक्ष्य ठेवली होती.ठरल्याप्रमाणे त्या ठिकाणी एक गाडी आली आणि सार प्रकार उघडकीस आला.हा प्रकार ग्रामस्थांनी पोलिसांना कळवला.जयगड पोलिसांनी अधिक तपास करून या प्रकरणी देवरुख येथील तिघांना व जाकादेवी येथून एकाला असे चार जणांना ताब्यात घेतले आहे व त्यांची चौकशी सुरू आहे.यापूर्वी देखील या ठिकाणी असे प्रकार घडत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
www.konkantoday.com