
भाजपमधील अंतर्गत गटबाजी असली तरी सर्वजण महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांचे पाठीशी
रत्नागिरी जिल्ह्यात भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसाठी
भाजपने माघार घेतली आहे तरी देखील काही प्रमाणात असलेली नाराजी बाजूला ठेवून भाजप शिवसेना उमेदवारांच्या विजयासाठी कामाला लागला आहे .सध्या जिल्हा भाजपमध्ये माजी आमदार बाळ माने समर्थक व नूतन जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन समर्थक यांच्यात तालुका अध्यक्षपदाच्या निवडीवरून भाजप कार्यकर्त्यांचात अंतर्गत मतभेद जाहीर झाले होते .काल रत्नागिरी दौर्यावर आलेल्या आमदार प्रसाद लाड यांनी जिल्हाध्यक्ष दिपक पटवर्धन यांच्या बाजूने कौल देऊन त्यांनी केलेली निवड योग्य असल्याचे सांगितले होते त्यामुळे माने समर्थक नाराज झाले होते .भाजपमध्ये अंतर्गत मतभेद असले तरी रत्नागिरी विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे उमेदवार उदय सामंत यांनी भाजपमधील परिस्थिती चांगलीच हाताळली आहे त्यांनी दोन्ही गटांशी चांगले जुळवून घेतले आहे दोन्ही गटातील भाजप कार्यकर्ते उदय सामंत यांच्या विजयासाठी झटत आहेत .सामंत यांच्या विजयासाठी त्यांना जास्तीत जास्त मतदान करण्याचा दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी चंग बांधल्याने यावेळी सामंत यांच्या मताधिक्यात वाढ होणार हे निश्चित आहे.
www.konkantoday.com
________________
*पंचमी*
खवय्यांच्या आपुलकीचे,चविष्ट नाते पंचमीचे. . . . .
चटकदार लसूण चटणी ॥ लज्जतदार शेंगदाणा चटणी
सर्वत्र उपलब्ध
02352-221841
________________