केंद्र व राज्याच्या नेतृत्वामुळे कोकणचा कायापालट-विनोद तावडे
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा विकास करीत आहेत, त्यामुळे कोकणचा कायापालट होत आहे, त्याप्रमाणे महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांना भरघोस मतांनी विजयी करुन कोकणच्या प्रगतीमध्ये हातभार लावा आणि कोकणात विकासाचे एक नवीन पर्व आणूया , या असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी देवगड येथे केले. भाजप-शिवसेना,आरपीआय, रासप महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत वैभववाडी आणि देवगड येथे विजय संकल्प मेळावा आयोजित करण्यात आले होते .या मेळाव्याला मुंबई बँकेच अध्यक्ष प्रवीण दरेकर, महायुतीचे उमेदवार नितेश राणे,प्रमोद जठार,अजित गोगटे,सुभाष मयेकर,सुषमा खानोलकर,राजेंद्र राणे,अरविंद रावराणे,प्रणिता पाताडे,राजेश्री धुमाळे,भालचंद्र साठे,नासीर काझी,दिलीप रावराणे सुधीर नकाशे,आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com