गौड ब्राम्हण सभा कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग आयोजित ‘KPL २०२५’ क्रीडा महोत्सवउदयजी सामंत यांचे उपस्थिती*


कुडाळ हायस्कूल आणि बॅ. नाथ पै शिक्षण संस्था, सिंधुदुर्ग येथे गौड ब्राम्हण सभा कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठानतर्फे आयोजित १० वा क्रीडा महोत्सव KPL २०२५ या भव्य कार्यक्रमाला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या ज्ञाती बांधवांनी दाखवलेली एकता, नियोजन आणि बांधिलकी खरंच कौतुकास्पद आहे. मनीष दाभोळकर यांचं काटेकोर नियोजन, रणजीत देसाई, महेश ठाकूर, जगदीश वालावलकर, अरुण दाभोळकर, सुनील सौदागर यांच्यासह सर्व ज्ञातीबंधू भगिनींची मेहनत आणि समर्पण यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी झाला, असे मा. ना. उदयजी सामंत म्हणाले.

कार्यक्रमादरम्यान ज्ञातीच्या एकतेचा आणि विकासाचा संकल्प मांडताना मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितलं की —
“आपली ज्ञाती फक्त संख्येने नव्हे तर कृतीने मोठी व्हावी. समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांना बरोबर घेऊन पुढे जाण्याची ताकद आपल्या प्रत्येकात निर्माण झाली पाहिजे.”
तसेच, तरुण पिढी स्वतःच्या पायावर उभी राहावी यासाठी दरवर्षी अशा प्रकारचा उपक्रम आयोजित करण्याची कल्पनाही मांडली.

कार्यक्रमात बांबू शिल्पातून केलेला सत्कार खास ठरला — कारण महाराष्ट्रात बांबू धोरण लागू करणारा पहिला राज्य निर्णय आपल्याच ज्ञातीतील उद्योगमंत्र्यांनी घेतलेला आहे, हा अभिमानाचा क्षण आहे.
एकतेचा, संस्कृतीचा आणि समाजोन्नतीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमासाठी आयोजक, कार्यकर्ते आणि सर्व उपस्थित बांधवांचे मनःपूर्वक अभिनंदन, असे देखील मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button