मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित १५ रोजी स्वाभिमान पक्षाचे विलीनीकरण?
१५ आॅक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कणकवली येथे जाहीर सभा होत असून या सभेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष विलीन करणार असल्याची घोषणाही नारायण राणे यांनी केली.१५ तारीख नंतर भारतीय जनता पक्ष जिथे पाठविल तिथे मी प्रचाराला जाईन , असेही त्यांनी स्पष्ट केले.ते म्हणाले सावंतवाडी मतदारसंघात राजन तेली यांना माझा व माझ्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा संपूर्ण पाठिंबा आहे. माझे कार्यकर्ते एक दिलाने काम करून तेलींना निवडुन आणतील, असा विश्वास माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे यांनी व्यक्त केला.
www.konkantoday.com