शालेय विद्यार्थ्यांने केला मित्राच्या हातावर ब्लेडने वार
गावडे आंबेरे येथील राहणारा यश आंब्रे यांच्या हातावर त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या शाळेतील मित्राने ब्लेडने वार केल्याने
यश जखमी झाला. यातील फिर्यादी यश हा शाळेत शिकतो या शाळेत शिकणाऱ्या यशच्या मित्राला शाळेतील सरानी मारले त्यामुळे शाळा सुटल्यावर बसस्टॉपवर आले असता यश यांने मित्राला तुला सरांनी का मारले असे विचारले. याचा राग त्या मित्राला आला त्याने हातातील ब्लेडने याच्या डाव्या मनगटावर व दंडावर दोन भुवयामध्ये ब्लेडने वार केले व त्याला मारहाण केली यात यश हा जखमी झाल्याने त्याच्या मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
www.konkantoday.com