मुंबईत ही गाजणार रिफायनरी समर्थनाचा आवाज

शिरोडकर विद्यालयात जिल्ह्यातील रिफायनरी समर्थक एकत्र येऊन आता मुबंईतही समर्थनाचे रणशिंग फुंकणार असा ठराव करण्यात आला. ह्यावेळी सर्व ग्रामस्थांनी रिफायनरी समर्थनाची लढाई ही सर्व लोकांची असून भावी पिढीला ह्यासाठी फक्त सोशल मीडियावर समर्थन नाही तर आता वेळ पडली तर रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा असे आव्हान केले. ह्यावेळी मुबंईतील रिफायनरी समर्थन करणारी कमिटी स्थापन करण्यात आली आणि तिचे अध्यक्ष म्हणून श्री सुहास तावडे उपाध्यक्ष श्री. विनायक मयेकर आणि श्री प्रशांत गांगण ,सचिव श्री रणजित कुळकर्णी ,आणि खजिनदार श्री राजन गोठिवरेकर यांची नेमणूक करण्यात आली तसेच अन्य ग्रामस्थांची सभासद म्हणून नोंदणी करण्यात आली.ही कमिटी रिफायनरी समर्थनाची जनजागृती करेल तसेच कमिटीचा विस्तारही वाढवेल. आत्तापर्यंत रिफायनरीचे जे खोट चित्र लोकांसमोर नेलं गेलं त्यात कीती तथ्य आहे हे जाणून घेण्यासाठी आणि सत्य काय आहे ते जनतेसमोर आनण्यासाठी तरुण पिढी एकत्र येवून कोकणच्या विकासासाठी सतत कार्यशील राहण्याची गरज आहे आणि ह्याकरता फक्त नाणार नाही तर सर्व रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग वासियांनी एकत्र येऊन ला लढा लढला पाहिजे असे मत यावेळी ग्रामस्थांनी मांडले. काही विकृत लोकांची टोळी पर्यावरणाच्या नावाखाली जिला नाणार नव्हे तर देशाचेही काही देणं घेणं नाही ती फक्त विविध ठिकाणी जाऊन लोकांची डोकी भडकावून सरकारने जाहीर सर्व विकासाच्या प्रकल्पात बाधा आणण्यासाठी सतत कार्यरत असते. विशेष करून हेच लोक अणुऊर्जा ,तेच रिफायनरी , महामार्ग ,अायलॉग ,ही विशिष्ट टोळी प्रत्येक प्रकल्पात बाधा निर्माण करण्यासाठी कार्यरत असल्याने लोक जास्त संभ्रमात आहेत . एखादा प्रकल्प रद्द झाला की हे लोक तोंड ही दाखवत नाहीत .जर रिफायनरी नको तर तुम्ही आणा दुसरा कोणता उद्योग आणि जर ती कुवत तूमच्याकडे नसेल तर आम्हाला कायद्याला धरून लोकशाही मार्गाने काय करायचे ते कोणत्याही विद्वानाने शिकवण्याची गरज नाही असे मत ग्रामस्थानी मांडले. आज कोकणातील 70 % तरुण वर्ग मुबंई किंवा इतर शहरी भागात नोकरीनिमित्त विस्थापित झाला आहे तो का?गावात जर खरच उपजीविका करण्यासाठी उद्योग असतील तर विरोधाची मशाल घेऊन जे लोक धावत आहेत त्यानी मुबंईतिल नोकरी व्यावसाय सोडून गावी एक वर्ष तरी राहून दाखवावे .जे सर्व गब्बर श्रीमंत लोक आहेत त्यांनी माया मुबंईत जमवली आणि आता गावाच्या विकासाच्या गोष्टी करत आहेत त्यामुळे अश्या लोकांच्या खोटेपणा ला बळीन पडता माननीय.मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्या प्रमाणे रिफायनरी सारखे प्रकल्प आणण्यासाठी आपण सतत कार्यरत राहणे आवश्यक असून त्यासाठी रिफायनरीच नव्हे सतत कोकण विकासाचा ध्यास घेऊन काम करत राहील पाहिजे आणि म्हणूनच मुबंईतील स्थायिक लोकांनी *श्री पंढरीसाहेब आंबेरकर आणि श्री अविनाशसाहेब महाजन व अन्य रत्नागिरी वासीयांनी कोकण विकासासाठी हाती घेतलेल्या पवित्र कामला पाठबळ देण्यासाठी मुबंईतील रिफायनरी समर्थन कमिटी बांधील राहील असा विश्वास ग्रामस्थानि दिला. यावेळी श्री प्रवीण खांबल,दीपक गिरकर,श्री सुहास तावडे,श्री मोडकर, श्री प्रशांत गांगण,श्री.रणजीत कुळकर्णी, श्री विनायक मयेकर ,श्री राजू मयेकर,श्री स्वप्नील अवसरे, श्री दादा तावडे ,श्री सुधीर तावडे ,आणि अन्य ग्रामस्थांनी आपले विचार मांडले तसेच श्री अविनाश महाजन आणि श्री पंढरी आंबेरकर यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button