
दापोली कोकण कृषी विद्यापीठाने संशोधित केलेल्या रत्नागिरी-८ भाताची शेतकर्यांकडून वाढती मागणी.
दापोली कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत केलेल्या भाताच्या संशोधनात रत्नागिरी-८ हे वाण शेतकर्यांच्या पसंतीस उतरले आहे. यावर्षी कोकण कृषी विद्यापीठाने रत्नागिरी-८ या वाणाचे २०० टन बियाणे वितरित केले असून या विक्रीतून विद्यापीठाने २४ लाखांची उलाढाल केली आहे.
कोकणातील पालघर ते सिंधुदुर्गपर्यंतच्या शेतकर्यांनी या वाणाला पसंती दर्शविल्याचे समोर आले आहे.दापोली कोकण कृषी विद्यापीठांतर्गत २०१८ साली रत्नागिरीनजिकच्या शिरगांव येथील भात संशोधन केंद्रात हे वाण विकसित झाले. १३५ ते १३८ दिवसात तयार होणारे हे पिक मध्यम बारीक आणि चवीला दर्जेदार आहे. त्यामुळे दरवर्षी या वाणाची मागी वाढत आहे.www.konkantoday.com