कणकवलीचे उमेदवार सतीश सावंत यांनी अखेर बांधले शिवबंधन
एकेकाळी नारायण राणे यांचे खंदे समर्थक म्हणून समजले जाणारे जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी नितेश राणे यांच्याविरोधात कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.सेना भाजप युतीमध्ये कणकवली विधानसभा मतदारसंघाची जागा ही भारतीय जनता पार्टीच्या वाटयाला आली होती. त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने नीतेश राणे यांना उमेदवारी दिली.परंतु या उमेदवारीच्या विरोधात शिवसेनेने सतीश सावंत यांना आपली उमेदवारी घोषित केली.त्याप्रमाणे सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला.काल शिवतीर्थावर सतीश सावंत यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले.यावेळी खासदार विनायक राऊत ,खासदार अरविंद सावंत,भाजपचे संदेश पारकर तसेच कणकवलीमधील शिवसैनिक उपस्थित होते.संपूर्ण राज्यामध्ये सेना भाजप युती आहे परंतू सिंधुदुर्गामध्ये चित्र वेगळे आहे.त्यामुळे कणकवली विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही रंगतदार होणार यात काही शंका नाही.
www.konkantoday.com
_________________________
*माई हुंडाई रत्नागिरीमधून सेंट्रो सीएनजी कार खरेदी करा आणि पेट्रोल दरवाढीची चिंता सोडा संपर्क-9922949540,9206202122*