
रत्नागिरीतून कतार आणि इंग्लंडला हापूस आंब्याची पहिली शिपमेंट २६ मार्चला जाणार
यंदा हापूसचे उत्पादन अत्यंत कमी असले तरीही त्यावर मात करून रत्नागिरीतून कतार आणि इंग्लंडला पहिली शिपमेंट २६ मार्चला जाणार आहे. रत्नागिरी तालुक्यातील तीन बागायतदारांकडील सुमारे सातशे डझन हापूस आंबा प्रक्रिया केंद्रात दाखल झाला आहे.
आंबा निर्यातीसाठी बागातयदारांना वाशी आणि लासलगाव येथील प्रक्रिया केंद्राकडे जावे लागत होते; मात्र रत्नागिरीत ही व्यवस्था दिल्यामुळे बागायतदारांना दिलासा मिळाला. गतवर्षी कोरोनामुळे आंबा निर्यात कमी झाली. यंदा लवकरात लवकर निर्यात व्हावी यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यासाठी पणन विभागाने हे प्रक्रिया केंद्र सद्गुरू एंटरप्रायझेसला चालविण्यासाठी दिले होते.
www.konkantoday.com