भीक मागून जमवले लाखो रुपये
मुंबईतील गोवंडी रेल्वे स्थानकाजवळ लोकलच्या धडकेत बिरदीचंद आझाद या भिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. रेल्वे पोलीस दलाचे जवान त्याच्या कुटुंबीयांना याबाबतची माहिती देण्यासाठी त्याच्या झोपडीत गेले, त्यावेळी त्याच्याकडील पैसे बघून जवानही चक्रावून गेले. त्याच्या झोपडीत गोण्यांमध्ये नाणी आणि नोटा भरून ठेवल्या होत्या. ही रक्कम सुमारे दोन लाखांच्या घरात आहे
एवढेच नाही, तर भिकाऱ्याचे बँक खातेचे पासबुकात त्याच्या खात्यावर त्याने आठ लाख ७७हजार रुपये जमा केल्याच्या पावत्या मिळाल्या आहेत. बिरदीचंदने मुंबईतील लोकलमध्ये भीक मागून हे पैसे जमवले आहेत.
www.konkantoday.com