
रत्नागिरी जिल्ह्यात भाजप मधले बंड शमले ,बंडखोर उमेदवारांची माघार
विधानसभा निवडणुकीत अर्ज मागे घेण्याला काही तास शिल्लक असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपच्या बंडखोर उमेदवारांना समजावण्यात भाजपच्या श्रेष्ठींना यश आले आहे .भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी या कामी मोलाची कामगिरी पार पाडली. रत्नागिरी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात भाजपच्या बंडखोर उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली.चिपळूणमधून उभे असलेले भाजपाचे बंडखोर उमेदवार तुषार खेतल ,दापोली मतदारसंघातील भाजपाचे बंडखोरउमेदवार केदार साठे ,राजापूर मतदारसंघातील भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद पाटोळे व संतोष गांगण तसेच गुहागर मतदार संघातील भाजपच्या बंडखोर उमेदवारानी आपला अर्ज मागे घेतला. यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांनी आता निश्वास सोडला आहे. याबाबत बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी ही निवडणूक महायुती म्हणून लढवत आहाेत. एकही मतदारसंघ न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज होते परंतु काल शिवसेना आणि भाजपचे संयुक्त बैठक झाली. या बैठकीत युतीची भूमिका सर्वांना पटवून देण्यात आली यामुळे या उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात नाराज भाजपच्या उमेदवारानीअपक्ष म्हणून अर्ज भरले होते ते मागे घेण्यात आले आहेत .याशिवाय भाजपचे कार्यकर्ते मनापासून युतीचे काम करणार असल्याने जिल्ह्यातील शिवसेनेच्या उमेदवारांची स्थिती आता भक्कम झाली आहे.जिल्ह्यात प्रथमच मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली असताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी ही परिस्थिती सक्षम पणे हाताळून भाजप सेना युती भक्कम करण्यात यश मिळवले आहे. सिंधुदुर्गात कणकवली मतदारसंघातून अपक्ष म्हणून उभे राहिलेले संदेश पारकर यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे.
www.konkantoday.com
________________*पंचमी*
खवय्यांच्या आपुलकीचे,चविष्ट नाते पंचमीचे. . . . .
*चटकदार लसूण चटणी ॥ लज्जतदार शेंगदाणा चटणी*
सर्वत्र उपलब्ध
02352-221841
________________