भाजपमधील बंडखोरी संपली ,राजापूर मतदार संघात शिवसेना उमेदवाराविरोधात विरोधी भूमिका घेतलेल्यांचे काय ?
विधानसभा निवडणुकीला अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपमधील नाराज बंडोबांना शांत करण्यात भाजपाला यश आले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेत चारही विधानसभा मतदारसंघातून भाजपमधील नाराज बंडखोरी केलेल्या उमेदवारानी अर्ज मागे घेतल्याचे जाहीर केले. असे असले तरी राजापूर मतदारसंघातील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार राजनजी साळवी यांना उमेदवारी देऊ नये म्हणून लांजा येथील काही शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती आता साळवी हेच शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असल्याने त्यांना विरोध करणाऱ्या या पदाधिकाऱ्यांबाबत शिवसेनेचे वरिष्ठ नेत्यांनी नेमकी काय भूमिका घेतली हे अद्याप जाहीर झालेले नाही या विरोधकांनी आपला विरोध त्यावेळी जाहीर केला होता परत साळवी यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी पाठिंबाही जाहीर केलेला नाही. त्यामुळे भाजपमधील बंडखोरी मिटवण्यात युतीला यश आले असले तरी शिवसेनेतील या नाराजीबाबत नेत्यांनीही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही एकीकडे काँग्रेसचे राजापूरचे उमेदवार अविनाश लाड यांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या नाराज गट आपल्या संपर्कात असल्याचे सांगितले हाेते.
www.konkantoday.com
________________
*माई हुंडाई रत्नागिरीमधून सेंट्रो सीएनजी कार खरेदी करा आणि पेट्रोल दरवाढीची चिंता सोडा संपर्क-9922949540,9206202122*