थोर समाजसेविका कुमुदताई रेगे यांचे मुंबईत निधन
रत्नागिरीतील थोर समाजसेविका व विचारवंत कुमुदताई रेगे(९२) यांचे मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले. कुमुदताई रेगे यांनी समाजातील शोषित दुर्बल घटकांच्या सामाजिक पुनर्वसनासाठी आपले उभे आयुष्य झोकून दिले. लांजा येथील जानकीबाई तेंडुलकर महिलाश्रम संस्थेच्या स्थापनेत त्यांचा मोठा पुढाकार होता .त्या संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष होत्या .याशिवाय महिला मंडळ, मनोरुग्णालय ,बाल न्यायालय ,निरीक्षण गृह आदी संस्थांवर त्यांनी काम केले हाेते. रत्नागिरीतील अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्यपद त्यांनी सांभाळले होते.त्यांना विविध क्षेत्रातील राष्ट्रीय आणि जागतिक मानसन्मान मिळाले होते.
www.konkantoday.com