वेंगुर्ले येथील कृषी पर्यटन परिषदेत ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’चा सन्मान
वेंगुर्ले : जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून कोकण भूमी कृषी पर्यटन सहकारी संस्थेच्या वतीने वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आलेल्या कृषी पर्यटन परिषदेत चिपळूणच्या ग्लोबल चिपळूण टुरिझम या संस्थेला पर्यटन विकास कामातील सातत्यपूर्ण योगदानासाठी सन्मानित करण्यात आले. संस्थेचा हा सन्मान ब्रिगेडीयर हेमंत महाजन यांच्या हस्ते संचालक आणि पर्यटनदूत समीर कोवळे यांनी स्वीकारला. यावेळी पर्यटन क्षेत्रात कार्यरत राज्यभरातील व्यक्ती आणि संस्थांना सन्मानित करण्यात आले. चिपळूणला ‘पर्यटन डेस्टिनेशन’ बनविण्यासाठी गेली ६ वर्षे सलग प्रयत्न करणाऱ्या ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टीपर्पज को. ऑप. सोसायटी लि.’ ह्याही संस्थेने आपल्या कामातून, उपक्रमांतून चिपळूणकर नागरिक, सर्वदूर परिसरातून येणारे पर्यटक, पर्यटन व्यावसायिक, समाजमाध्यमे यांच्या नजरेत चिपळूण पर्यटन विकासासाठी प्रयत्नशील संस्था म्हणून ओळख मिळवली आहे.
www.konkantoday.com