
रत्नागिरी कारागृहाला आय एस ओ मानांकन
रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहाला शुक्रवारी आएसओ मानांकन प्रमाणपत्र प्राप्त झाले. कारागृहाने यासाठी आवश्यक सर्व बाबींची पूर्तता केल्याने हे शक्य झाले. सीसीटीव्ही, व्हिडीओ काँन्फरन्स, महिला कर्मचारी विश्रांती कक्ष, टेलीमेडिसीन यासह अनेक नाविन्यपूर्ण बाबींची पूर्तता केली आहे. यासाठी कारागृह अधीक्षक आर.आर.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे मानांकन मिळाले असून तुरुंगाधिकारी अमेय पोतदार व सर्व कारागृह कर्मचारी वर्ग यांनी मेहनत घेतली. याबद्दल कारागृह प्रशासन कडून अभिनंदन करण्यात आले आहे. यासाठी अभिविक्षा भारतीय चे.सहकार्य मोलाचे ठरले.
www.konkantoday.com