
हापूस आंबा, काजूचा मोहोर सुकल्याने मोठे नुकसान, शासनाने नुकसान भरपाई देण्याची शौकत मुकादम यांची मागणी
हवामान सतत बदलत असल्यामुळे आंबा व काजुच्या मोहोरावर परिणाम झाला आहे. बहुतांश आंबा व काजूचा मोहोर सुकून खाली पडल्यामुळे उत्पन्नामध्ये फार मोठी घट झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ५० टक्के मोहोर आंबा, काजूवर टिकला नाही. कोकणातील बागायतदार व परसबाग असणारी झाडे अडचणीत आली आहेत. काही बागायतदारांनी पिक विमा काढला आहे. परंतु संबंधितांना विमा कंपनी हेलपाटे मारावयास लावत आहे. तालुका व पंचायत समितीत कृषि अधिकारी कमी असल्यामुळे पंचनामेही वेळेवर होत नाहीत. एका कृषी सहाय्यकाकडे पंधरा ते सोळा गाव देण्यात आल्यामुळे पंचनामेही वेळेवर होत नाहीत. तरी जिल्हा कृषि अधिकार्यांनी याकडे लक्ष घालून पीक विमा कंपनी व शासनाकडे बागायतदार व शेतकर्यांचे पंचनामे ताबडतोब पाठवावेत, अशी मागणी चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती व पर्यावरण प्रेमी शौकतभाई मुकादम यांनी केली आहे. www.konkantoday.com