“बंड” करणाऱ्यांना “थंड” करण्यासाठी महायुतीची कोअर कमिटीची आज महत्त्वाची बैठक
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील काही मतदारसंघात शिवसेना व भाजप उमेदवाराने बंडखोरी करून अर्ज दाखल केल्याने महायुती अडचणीत आली आहे. यातून सामंजस्याने मार्ग काढण्यासाठी आज रत्नागिरी भाजप जिल्हा कार्यालयात महायुती कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ७ऑक्टोबरला अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यापूर्वी महायुतीतील बंडखोरी संपुष्टात यावी यासाठी दोन्ही पक्ष यांच्याकडून प्रयत्न केले जाणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत देखील दोन्ही पक्षातील बंडखोर दोन दिवसात अर्ज मागे घेतील असा विश्वास व्यक्त केला होता त्यांनी तसे न केल्यास महायुतीकडून त्यांची गय केली जाणार नाही असा इशाराही दिला होता. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील उमेदवारही हजर राहणार आहेत त्यामुळे ही बैठक बंड करणाऱ्यांना थंड करण्यात यशस्वी होणार की नाही हे लवकरच कळेल .
www.konkantoday.com
________________________
*माई हुंडाई रत्नागिरीमधून सेंट्रो सीएनजी कार खरेदी करा आणि पेट्रोल दरवाढीची चिंता सोडा संपर्क-9922949540,9206202122*