
हजारो समर्थकांच्या उपस्थितीत सेना भाजप युतीचे राजन साळवी यांनी उमेदवारी अर्ज भरला
राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-शिवसंग्राम-रयतक्रांती महायुतीचे अधिकृत उमेदवार राजन प्रभाकर साळवी ह्यांनी राजापूरयेथे शिवपुतळ्याला व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पणकरून तसेच सुप्रसिद्ध दर्ग्याला चादर अर्पण करून आपल्या हजारो समर्थक, असंख्य शिवसैनिक व प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखलकेला.यावेळी माजी आमदार गणपतराव कदम, जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे ,जिल्हा प्रमुख विलास चाळके, सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक ,तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष अनिल करंगुटकर ,सौ शितल पटेल ,भाजपच्या श्रीमती उल्का विश्वासराव ,जिप अध्यक्षा सौ स्वरूपा साळवी, सभापती अभिजित तेली, जगदीश राजापकर पंचायत समिती सदस्य जया माने ,सेना भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
www.konkantoday.com