
रत्नागिरीतील महेश गुंदेचा आणि तुषार खानविलकर यांनी दहा किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण केली
गांधी जयंती निमित्त स्वच्छ भारतचा संदेश घेऊन मुंबईतील वाशी येथे मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली होती. या मॅरेथॉन स्पर्धेत रत्नागिरीतुन सहभागी झालेले महेश गुंदेचा आणि तुषार खानविलकर यांनी दहा किलोमीटरचे अंतर पार करत चमकदार कामगिरी केली. यापूर्वीदेखील या दोघांनी विविध मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेत यशस्वी कामगिरी केली होती.
‘स्वच्छ भारत’चा संदेश घेऊन रन फार इंडीया या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन मुंबईतील वाशी येथील पाम बीच येथे करण्यात आले होते. दहा किलोमीटर आणि एकवीस किलोमीटर या दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेसाठी रत्नागिरीतुन उद्योजक महेश गुंदेचा आणि तुषार खानविलकर हे दोघे दहा किलोमीटर गटात उतरले होते.सकाळी साडेपाच वाजता स्पर्धेची सुरूवात झाली. वाशी येथील पाम बीच येथून स्पर्धेचा शुभारंभ झाला. या स्पर्धेत राज्यभरातुन तीन हजारपेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.
दहा किलोमीटरच्या गटात उतरलेल्या रत्नागिरीतील महेश गुंदेचा यांनी हे अंतर एक तास आणि ३ मिनिटांत पूर्ण केले. तर तुषार खानविलकर यांनी एक तास आणि दहा मिनिटांत अंतर पूर्ण केले. स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल दोघांनाही विशेष प्रशस्तिपत्रक आणि मेडल देऊन गौरवण्यात आले.
www.konkantoday.com