मोठ्या जनसागराच्या उपस्थितीत आमदार उदय सामंत यांनी भरला उमेदवारी अर्ज

सेना भाजप महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांनी भव्य दिव्य शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्याआधी विवेक मैदानावर झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला ग्रामीण व शहरी भागातून कार्यकर्त्यांच्या अलोट जनसागर उसळला होता. त्यामुळे हा परिसर भगवा मय झाला होता.आमदार उदय सामंत यांच्या प्रेमाखातर प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते व स्वप्नील बांदोडकर यांनी देखील या ठिकाणी हजेरी लावून आपल्या गायनाने लोकांना मंत्रमुग्ध केले.या मेळाव्यात उपस्थित जनसागराने अबकी बार एक लाख पार अशा घोषणा देऊन उदय सामंत यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचे जाहीर करण्यात आले .त्यानंतर उदयजी सामंत मिरवणुकीने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आले यावेळी खासदार विनायक राऊत माजी मंत्री रवींद्र माने ,सुभाष बने ,गणपत कदम, जिल्हा प्रमुख विलास चाळके ,संपर्कप्रमुख सुधीर मोरे ,सरचिटणीस मंगेश साळवी ,राजू महाडिक ,नगराध्यक्ष बंड्या साळवी आणिभारतीय जनता पक्षाचे माजी आमदार बाळ माने,जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन अशोक मयेकर अॅड विलास पाटणे मुन्ना चवंडे शहराध्यक्ष सचिन करमरकर सेना व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते .
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button