
जिल्हा परिषदेचे अनुदानित पाचही दवाखाने बंद
जिल्हा परिषदेने सेस अनुदानातून सुरू केलेले दवाखाने अखेर जिल्हा परिषदेला बंद करावे लागले आहेत. दुर्गम अतिदुर्गम भागातील ग्रामस्थांना आरोग्याची अत्यावश्यक सेवा पुरवावी या हेतूने हे दवाखाने सुरू करणेत आले होते. मंडणगड तालुक्यातील आंबडवे ,खेडमधील नातूनगर, चिपळूणमधील असुर्डे, रत्नागिरीमध्ये गावखडी, राजापूरमध्ये सागवे या टीकेने जिल्हा परिषदेने हे दवाखाने सुरु केले होते या दवाखान्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सर्व खर्च शासकीय निधीतून केला जात होता मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर हे दवाखाने बंद करण्यात आले आहेत .
www.konkantoday.com