
चिपळूण नगर परिषद करणार हजारो वृक्षांची लागवड.
यावर्षी चिपळूण नगर परिषद शहरातील विविध भागात १ हजार २०० वृक्षांची लागवड करणार आहे. त्यासाठी वृक्षही उपलब्ध करण्यात आले आहेत. या लागवडीचा शुभारंभ जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५ जून रोजी करण्यात येणार आहे. दरवर्षी वृक्ष लागवडीसाठी अडीच रुपयांचा खर्च केला जात असून गेल्या तीन वर्षात लावलेल्या ४ हजार वृक्षांपैकी ३ हजार वृक्ष जगली आहेत. यासाठी कर्मचार्यांची मेहनत कामी आली आहे. सर्वत्र होणारी वृक्षतोड, त्याबदल्यात न होणारी लागवड याचा परिणाम वातावरणावर होत असून दरवर्षी उष्म्यात मोठी वाढ होताना दिसत आहे. यावर्षी तर उष्प्याने अधिकच हैराण केले होते.
यावर्षी अवकाळी पावसाने १० दिवस तालुक्याला झोडपून काढले. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या बदलणार्या पर्यावरणाला पूर्वपदावर आणण्यासाठी पावसाळ्यात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याच्या सूचना शासनस्तरावरून केल्या जात आहेत. दरवर्षी नगर परिषदेच्या विभागाला दिल्या आहेत. उद्यान विभागाच्या माध्यमातून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्ष लावली जातात. यावर्षी १ हजार २०० वृक्ष लावण्याचा संकल्प मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी केला आहे. तशा सूचना त्यांनी उद्यान विभागाला दिल्या आहेत.www.konkantoday.com