मुंबई गोवा महामार्गावर बहादूरशेख नाका येथे उड्डाणपूल तर सावर्डे येथे भुयारी मार्ग
मुंबई गोवा महामार्गावर बहादूरशेख नाका येथे उड्डाणपूल होणार आहे तर सावर्डे येथे भुयारी मार्ग केला जाणार आहे अशी माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली
मध्यंतरी काही कारण्यामुळे महामार्गाचे काम मंदगतीने चालू हाते आता८ ऑक्टोबरपासून हे काम वेगाने सुरू होणार आहे. या महामार्गासाठी आवश्यक असणारी सर्व बांधकामे हटवली जाणार आहेत. चौपदरीकरणाचे काम तातडीने सुरू होणार आहे.बाधित होणाऱ्या जमीन मालकांना मोबदला मिळाला नाही त्यांना मोबदला दिला जाईल परशुराम येथील मूळ मालक व कुळवहिवाटदार यांचा प्रश्न न्यायालयात असल्याने मोबदल्याचे ४८ कोटी रुपये न्यायालयात जमा करण्यात आले असल्याचीही माहिती त्यानी दिली. बहादूरशेख नाका ते प्रांत कार्यालय असा १८४०मीटरचा उड्डाणपूल होणार आहे .
www.konkantoday.com