मिरकरवाडा येथील प्राधिकरणाची इमारत मोडकळीला
रत्नागिरी येथील मिरकरवाडा येथे असणारी प्राधिकरणाची इमारत मोडकळीला आली आहे .या इमारतीची कोणतीही देखभाल होत नसल्याने या इमारतीत काम करणारे प्राधिकरणाचे कर्मचारी अक्षरशा जीव मुठीत धरून काम करीत आहेत. या इमारतीची अवस्था दिवसेंदिवस जीर्ण होत असून इमारतीच्या स्लॅबमधील स्टीलही दिसू लागले आहे. शिवाय परिसरात सगळीकडे रान उगवले आहे या इमारतींच्या दुरुस्तीसाठी लक्ष देण्यात येत नसल्याने आहे त्या परिस्थितीत कर्मचारी काम करीत आहेत.
www.konkantoday.com