
कोकण रेल्वे मार्गावर क्रॉसिंग स्थानक प्रकल्पाचे ९६ टक्के काम पूर्ण झाल्याने ट्रेनना आता क्रॉसिंगकरिता थांबावे लागणार नाही konkanrailway crossing station
येत्या नवीन वर्षात कोकणवासीयांचा रेल्वे प्रवास अधिक वेगवान होणार आहे. रोहा ते वीर या मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे ट्रेनचा वेग वाढणार आहे.तसेच ‘क्रॉसिंग स्थानक प्रकल्पाचे ९६ टक्के पूर्ण झाल्याने।ट्रेनना आता क्रॉसिंगकरिता थांबावे लागणार नाही.
Konkanrailway crossing station work completed 96%
तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी २०१५ मध्ये कोकण रेल्वेच्या विद्युतीकरण आणि दुहेरीकरणाची घोषणा केली होती. कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशी वाहतुकीसोबतच मालवाहतूकही मोठ्या प्रमाणात होते. कोकण रेल्वे मार्गावर दोनच मार्ग असल्याने गणेशोत्सवात जादा ट्रेन सोडल्यास वेळापत्रक विस्कळीत होते.
त्यामुळे रोहा ते ठोकूर या ७०० किलोमीटर मार्गाचे दुहेरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. रोहा ते वीर या ४६.८९ किलोमीटरचे काम गेल्या तीन वर्षांपासून केले जात आहे. या मार्गाचे ९६ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरित ४ टक्के काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी एल. के. वर्मा यांनी दिली.
www.konkantoday.com
