
रत्नागिरी शहरातील परटवणे पुलाच्या जोडरस्त्याचे बांधकाम नऊ वर्षे प्रलंबित -माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर
रत्नागिरी शहरातील परटवणे पुलाच्या जोडरस्त्याचे बांधकाम नऊ वर्षे प्रलंबित आहे. ते बांधकाम होणे आवश्यक आहे. अशी मागणी माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी केली आहे. परटवणे पुलाचे बांधकाम २०१२ मध्ये पूर्ण झाले. मात्र जोड रस्त्याचे बांधकाम झालेले नाही. या कामासाठी नागरी दलित वस्तीतून २००९ मध्ये ४३ लाख रुपये मंजूर होते. मात्र २०११ पर्यंत या पुलाच्या कामाकडे कोणीही लक्ष दिलेले नाही. आपण नगराध्यक्ष झाल्यावर त्या पुलाच्या कामाच्या निविदा प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर ६० लाखांच्या जोड रस्त्याचे अंदाजपत्रकही तयार केले. पण कार्यकाळ संपल्यानंतर आजपर्यंत त्या जोड रस्त्याच्या कामाकडे कोणीही लक्ष दिलेले नाही. तो जोड रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा, अशी मागणी कीर यांनी केली. या रस्त्यावरून स्थानिक नागरिकांची तसेच पर्यटकांची रहदारी सुरू असते. www.konkantoday.com