
उमेदवारी अर्ज दाखल करताना आमदार उदय सामंत मोठे शक्तीप्रदर्शन करणार
रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून आपणाला सेना भाजप युतीतर्फे उमेदवारी मिळाली असून आपला विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केला ४ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत त्याआधी हॉटेल विवेकच्या मैदानावर सेना भाजपा युतीची सभा होईल या सभेसाठी तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर युतीचे कार्यकर्ते उपस्थित राहणार असून मोठे शक्तिप्रदर्शन करीत आमदार उदय सामंत अर्ज दाखल करणार आहेत आपण आपल्या आमदारकीच्या कारकिर्दीत अनेक विकास कामे केली आहेत यामुळे या मतदारसंघातील जनता आपल्या पाठीशी उभी आहे भाजप वा इतर मित्र पक्षाचे कार्यकर्ते आपल्यासाठी एक दिलाने काम करीत आहेत निवडणुकीत आम्ही समोरच्याला कमी लेखत नाही मतदारसंघातील ७५ मुस्लिम समाज आपल्या बरोबर आहे. युतीचे कार्यकर्ते व्यक्तिगत पत्रे ,पक्षाचा जाहीरनामा व मतदारांकडे स्लिपा वाटप अशा माध्यमातूनन तीन वेळा संपर्कात राहणार आहाेत याशिवाय तालुकाध्यक्ष बंड्या साळवी यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात संपर्काचे काम सुरू आहे अतिवृष्टीमुळे रस्ते खराब झाले असून डिसेंबरनंतर पाचशे ते सहाशे किलोमीटरचे रस्ते केले जाणार आहे स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी आपले प्राधान्य राहणार आहे यामुळे आपल्याला म्हणजे युतीच्या उमेदवाराला ८० टक्के पेक्षा जास्त मतदान होईल असा अंदाज आहे जनतेच्या पाठिंब्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचेही सामंत यांनी सांगितले
www.konkantoday.com