आपला विजय निश्चित -राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुदेश मयेकर यांचा विश्वास

आपणाला राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीच्यावतीने रत्नागिरी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली आहे आपण बेरोजगारांचा प्रश्न पर्यटन व विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढविणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे रत्नागिरी मतदारसंघातील उमेदवार सुदेश मयेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली विद्यमान आमदारानी पाच वर्षात काय केले हे जाहीर करावे उलट ते राष्ट्रवादीत असताना त्यानी विकासाची कामे केली त्यामध्ये महिला रुग्णालय क्रीडा संकुल परचुरे येथील पुल जिजामाता उद्यान जलतरण तलाव ही कामे झाली ती राष्ट्रवादीच्या काळात केली त्यावेळी मंत्री असलेल्या तटकरे साहेबांनी निधी दिला या कामाचे श्रेय आमदारांना नाही तर ते राष्ट्रवादीपक्षाला आहे आमदारांनी राष्ट्रवादीला दगा देऊन व बेवारस सोडून दुसऱ्या पक्षात गेल्याचा आरोप मयेकर यांनी केला आपण तालुकाध्यक्ष पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर तालुक्यातील जनतेशी संपर्क ठेवला सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी पाखाडी रस्ता हाच विकास असा लोकांच्यात भ्रम निर्माण केला होता तो भ्रम आता दूर होत आहे विद्यमान आमदार बेरोजगारांचा प्रश्न , पर्यटनाचा प्रश्न हाताळण्यात कमी पडले आहेत या सर्वांमुळे आम्हाला लोकांच्या कडून पाठिंबा मिळत आहे आपण शहरातून पाच हजाराची तर तालुक्यातून दहा हजाराची आघाडी घेणार असल्याचेही मयेकर यांनी स्पष्ट केले
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button