राजापुरात अजित यशवंतरावना डावलल्यास राजकीय भूकंप
काँग्रेस आघाडीकडून राष्ट्रवादीच्या अजित यशवंतराव यांना उमेदवारी न मिळाल्यास काँग्रेसचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते आपली ताकद दाखवतील असा इशारा काँग्रेसचे सरचिटणीस व जिल्हा बँकेचे संचालक मनोहर सप्रे यांनी दिला आहे .लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाची वाताहत झाली होती तरीदेखील पक्षाने विचार धोरणात बदल न केल्यास आता येत्या विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही आमची ताकद दाखवून दाखवू. युवा नेते अजित यशवंतराव यांनी गेल्या साडेचार वर्षात सत्ता नसताना देखील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन चांगले काम केले आहे. जिल्ह्यातील काही स्वयंघोषित नेते जिल्ह्यातील काँग्रेस संपवण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यामुळे ते यशवंतराव यांच्या उमेदवारीला विरोध करीत आहेत. सप्रे यांच्या स्पष्ट भूमिकेमुळेराजापुरात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.
www.konkantoday.com
________________________
*माई हुंडाई रत्नागिरीमधून सेंट्रो सीएनजी कार खरेदी करा आणि पेट्रोल दरवाढीची चिंता सोडा संपर्क-9922949540,9206202122*