दापोलीमध्ये भाजपची बंडखोरी?,जिल्हा सरचिटणीस केदार साठे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला
दापोली विधानसभा मतदार संघाची जागा युतीच्या वाटपात शिवसेनेकडे गेली आहे या मतदारसंघातून राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे राज्यात भाजप सेना युती आहे असे असताना देखील भाजपचे जिल्हा सरचिटणीस केदार साठे यांनी आज भाजपकडून व अपक्ष असे दोन अर्ज दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्याच्या पाचही मतदारसंघातून भाजपला डावलण्यात आल्याने कार्यकर्ते नाराज आहेत आता साठे यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने भाजपमध्ये बंडखोरी होणार की पक्षाचा वरून आदेश आल्यावर भाजप माघार घेणार याचा लवकरच स्पष्ट होईल.
www.konkantoday.com