
साडेतीन कोटीची फसवणूक मध्यवर्ती बँकेच्या शाखाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
कर्ज प्रकरणासाठी खोटी कागदपत्रे तयार करून बँकेची साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माळनाका शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी सचिन चौगुले यांच्याविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
त्यांच्या विरोधात बँकेचे लेखा क्षेत्र तपासणीस सुनील गुरव यांनी तक्रार दिली असून चौगुले हे जुना माळनाका शाखेत शाखाधिकारी म्हणून २०१४ते२०१८या कालावधीत काम करीत असताना त्यांनी विविध कर्जप्रकरणात खोटी कागदपत्रे करून स्वतःच्या फायद्यासाठी बँकेचे नुकसान केले व संचालक मंडळाला अंधारात ठेवले व फसवणूक केली असा त्यांचेवर आरोप आहे.
www.konkantoday.com