
राजापूरचे आमदार राजन साळवी यांना उमेदवारी जाहीर झाल्याने ,बंड पुकारणारे अडचणीत
शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या विरोधात लांजातील शिवसेनेच्या एका गटाने पत्रकार परिषद घेऊन त्यांना तिकीट देण्यात येऊ नये अशी मागणी केली होती याबाबत त्यांनी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना पत्र पाठवले होते परंतु त्यांच्या पत्राची वरिष्ठानी दखलही न घेता आमदार राजन साळवी यांनाच परत उमेदवारी जाहीर केली .यामुळे साळवी यांच्या विरोधात बंड करण्यांना मोठा धक्का बसला आहे.
राजन साळवी यांना उमेदवारी मिळाल्याने समर्थकांनी आनंद व्यक्त करून फटाके फोडले. रात्रंदिवस मतदारसंघात फिरणाऱ्या आमदार राजन साळवी यांच्या विरोधात त्यांच्यावर जुने आरोप करून त्यांना ऐनवेळी अडचणीत आणण्याचा पक्षातील विरोधकांनी केलेला प्रयत्न शिवसेनेच्या वरिष्ठांनी राजन साळवी यांनाच परत तिकीट देऊन निष्फळ ठरवला आहे.
www.konkantoday.com