
रत्नागिरी तालुक्यात शिक्षकांची कमतरता
रत्नागिरी तालुक्यात अनेक शाळांमध्ये अद्यापही शिक्षकांची कमतरता असल्याचे निदर्शनास आले आहे. नुकतीच पंचायत समितीची मासिक सभा पार पडली त्यात हे उघड झाले. रत्नागिरी तालुक्यात अनेक शाळांमध्ये अद्यापही आवश्यक शिक्षक नाहीत.तालुक्यात ९६ शिक्षकांची पदे रिक्त होती त्यापैकी ४१पदे भरण्यात आली असली तरी अद्यापही ५५शिक्षकांची पदे रिकामी आहेत.
www.konkantoday.com