भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार तातडीने मुंबईत
सिंधुदुर्ग भाजपचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार प्रमोद जठार यांना तातडीने मुंबईत बोलावून घेण्यात आले आहे .भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा फोन आल्याने जठार हे तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत. मात्र त्यांना तातडीने बोलावून घेण्यामागची भूमिका अद्यापही स्पष्ट झालेली नाही .माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे यांचा भाजप प्रवेश अद्यापही थांबलेला आहे त्यामुळे जठार यांना पक्षाकडून तातडीने का बोलावण्यात आलेले आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
www.konkantoday.com