जिल्हा परिषदेच्या सीईओंवरील अविश्वास सभा स्थगित , आचारसंहितेमुळे ठराव बारगळला
गेले काही दिवस गाजत असलेले रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सीईओ आंचल गोयल यांच्यावर अविश्वास आणण्यासाठी बोलावण्यात आलेली सभा आचारसंहितेच्या मुळे तांत्रिक कारणामुळे स्थगित करण्यात आली आहे.मात्र रद्द झालेली सभा सदस्यांना वेळेत न कळवल्याने सदस्य आक्रमक झाले त्यांनी सभागृहात सभा घेतली या सभेत त्यांनी प्रशासनाने सभागृहाचा अवमान केल्याचे मत अनेक सदस्यांनी मांडले. ही सभा आचारसंहितेमुळे रद्द केल्याचे सांगण्यात आले असले तरी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कुठल्या नियमानुसार निर्णय घेतला यासाठी सत्ताधारी पक्षाचे सदस्य तज्ञांचे मार्गदर्शन घेणार आहेत जर यामध्ये सभागृहाची दिशाभूल झाली असल्याचे आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा जिप अध्यक्ष स्वरूपा साळवी यांनी दिला आहे शेवटी निवडणूक निर्णयाधिकारी यांच्या आदेशाचा मान राखत सभा रद्द करण्यात आली. आज जिल्हा परिषदेवर सीईओंवर अविश्वास ठराव आणण्याचा सभे वरूनही प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यात वाद रंगला आहे. विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने या सभेबाबत मार्गदर्शन मागवण्यात आले होते.
_____________________________________
पंचमी
खवय्यांच्या आपुलकीचे,चविष्ट नाते पंचमीचे. . . . .
चटकदार लसूण चटणी ॥ लज्जतदार शेंगदाणा चटणी
सर्वत्र उपलब्ध
02352-221841
______________________________________
आचारसंहिता असल्याने अविश्वास ठरावाची बैठक घेता येणार नाही असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.त्यामुळे ही सभा तांत्रिक कारणास्तव स्थगित केल्याचा फलक बाहेर लावण्यात आला हाेता.त्यावरून सदस्य आक्रमक झाले होते आता ही सभा आता विधानसभा निवडणुकीनंतर होण्याची शक्यता आहे जिल्हा परिषदेच्या सीईओ यांच्यावर अविश्वास ठरावासाठी सदस्यांनी केलेली तयारी सध्या तरी वाया गेली आहे .
www.konkantoday.com