कोकण रेल्वेच्या बोगद्यात प्रवाशांनी टाकलेले ६०० बँग प्लॅस्टिक जमा
कोकण रेल्वेने सध्या स्वच्छता पंधरवडा सुरू केला असून संपूर्ण कोकण रेल्वेमार्ग ब्लॅक प्लॅस्टिकमुक्त करण्याच्यासाठी मोहिम हाती घेण्यात आली आहे. रत्नागिरी जवळील करबुडे व अन्य बोगद्यातून ६००बॅक प्लॅस्टिक गोळा गोळा करण्यात आले. स्वच्छता अभियानाच्या उपक्रमासाठी विविध शाळांच्या विद्यार्थ्यांची मदत घेणेत येत आहे. कोकण रेल्वेचे स्टेशन व इतर ठिकाणी प्लास्टिक बंदीचाही प्राधान्य देण्यात येत आहे. त्यातील पहिले पाऊल म्हणून प्लॅस्टिकचे चमचेआणि कपावर बंदी घालण्यात आली आहे. यासाठी रेल्वे स्थानकांवर जनजागृतीही करण्यात येत आहे.
www.konkantoay.com