ऑनलाईनवरून जुनी कार खरेदी करण्याचा मोह नडला ,साडेतीन लाखांची फसवणूक
ऑनलाईनवरून सेकंड हँड कार खरेदीखरेदी करण्याच्या मोहापाई एका तरुणाला साडेतीन लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला.
.चिपळूण येथील राहणारा अमेय बेहेरे याने इंटरनेटवरील साइट वरून ऑनलाइन सेकंडहँड चारचाकी गाडी विकण्याची जाहिरात पाहिली. ही कार खरेदी करण्यासाठी त्याने संबंधितांशी मोबाईलवरून संपर्क साधला.समोरील अज्ञात लोकांनी वेगवेगळी नावे सांगून बेहरे यांच्याकडून ३लाख ६४हजार रुपये भरून घेतले.परंतु प्रत्यक्षात गाडी दिली नाही.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली.
www
konkantoday.com