
अखेर सेना भाजप युतीचे जमले,युतीची घोषणा
अखेर सर्वांना उत्सुकता लागून राहिलेली शिवसेना भाजप महायुतीची घोषणा अखेर आज करण्यात आली.भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक परिपत्रक काढून या युतीची घोषणा करण्यात आली.या परिपत्रकांमध्ये भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील तसे शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांची सही आहे.या महायुतीमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या बरोबरीने रासप,रिपाई,शिवसंग्राम,रयतक्रांती या मित्रपक्षांचा समावेश असल्याचे पत्रकामध्ये म्हटले आहे. महायुतीची घोषणा झाली असली तरी जागावाटपासंदर्भात लवकरच घोषणा करू असे म्हटले आहे.
www.konkantoday.com