कल्याणमध्ये शिवसेना बंडाच्या पावित्र्यात ?
कल्याण :कल्याण पश्चिम व कल्याण पूर्व विधानसभेच्या दोन्ही जागावर शिवसेनेने दावा केला आहे मात्र दोन्ही मतदार संघ शिवसेनेला न सोडल्यास भाजपा विरोधात दोन्ही मतदार संघातुन कल्याण शिवसेना शहर शाखेकडून उमेदवार उभा केला जाणार असल्याची माहिती कल्याण शहर शाखेचे शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांनी पत्रकारांना दिली.यावेळी कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघातून शिवसेनेकडून उमेदवारी साठी मूलाखत दिलेले इच्छुक उमेदवार विश्वनाथ भोईर, राजेंद्र देवळेकर, रवी पाटील, श्रेयस समेळ, अरविंद मोरे, साईनाथ तारे, मयूर पाटील यांच्यासह कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातून शिवसेनेकडून उमेदवारी लढण्यासाठी इच्छुक असलेले रमेश जाधव व महेश गायकवाड आदी सर्वच इच्छुक उमेदवारांनी भाजपाच्या उमेदवाराला विरोध करीत कोणत्याही परिस्थितीत भाजपाशी दोन हात करण्यासठी सज्ज झाले असून कल्याण शिवसेनेतील दोन्ही मतदार संघातील इच्छुक उमेदवारापैकी एका उमेदवाराला सर्वानुमते अपक्ष उमेदवार म्हणून उभा करून भाजपाची सीट पाडण्याचा निर्धार करीत शिवसेना शहरशाखे बाहेर सर्वच इच्छुक उमेदवारांनी आपला संताप व्यक्त करण्यासाठी घोषणा बाजी केली.