आमदार राजन साळवी यांना उमेदवारी मिळावी यासाठी पदाधिकारी सरसावले
राजापूर आणि लांजा तालुक्यातील शिवसेनेच्या झालेल्या बैठकीत विद्यमान आमदार राजन साळवी यांनाच पुन्हा उमेदवारी देण्याची भूमिका घेण्यात आली आहे. जिल्हाप्रमुखांच्या उपस्थितीत बैठक झाली त्याला जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य विभागप्रमुख शाखाप्रमुख असे८० पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकीत दोन दिवसांपूर्वी राजन साळवी यांच्या विरोधात प्रसारमाध्यमांकडेजाऊन पत्रकार परिषद घेणाऱ्या कार्यकर्त्यांनी संघटनेची शिस्त मोडल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे .
www.konkantoday.com