
सेवानिवृत्त नायब तहसिलदार लाचलुचपतच्या जाळ्यात
चिपळुणातील निवृत्त नायब तहसिलदार उल्हास कदम यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले.
गुहागरमध्ये एच एनर्जीच्या पाईपलाईनचे काम सुरु आहे. भूसंपादनाचे कामासाठी कदम यांची नेमणूक झाली होती. गुहागरमधील एका एका व्यक्तीला नऊ लाख रुपयांचा मोबदला देण्यासाठी त्यानी एकोणीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही लाच घेतांना लाचलुचपत खात्याच्या पथकाने त्यांना पकडले .
www.konkantoday.com