
सहदेव बेटकर नाराज ,अर्थ समितीच्या बैठकीला गैरहजेरी
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ सभापती सहदेव बेटकर हे नाराज आहेत.त्यांनी मध्यंतरी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खासदार सुनील तटकरे यांची सदिच्छा भेट घेतली होती.यावरून शिवसेनेतही खळबळ उडाली होती. यामुळे बेटकर यांच्यावर पक्ष कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. बेटकर हे शिवसैनिक असून ते गुहागर मतदारसंघातून विधानसभेसाठी यंदा इच्छुक होते. मात्र आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने सर्व गणिते बिघडली.त्यातून नाराज असलेल्या बेटकर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची सदिच्छा भेट घेतली. नुकतीच रत्नागिरी जिल्हा परिषदेची अर्थ समितीची सभा पार पडली .ही सभा सभापतींच्या अध्यक्षतेखाली पार पडते .
मात्र सभापती बेटकर हे त्या सभेला हजर राहिले नाहीत .यामुळे बेटकर यांच्या भूमीकेकडे लक्ष लागले आहे .
www.konkantoday.com