
राज्यात भाजप सरकार बहुमताने निवडून आल्यास ओबीसीचे आरक्षण संपविण्यात येईल – वंचित चा आरोप
विधानसभा निवडणुकीत भाजप सरकार बहुमताने निवडून आल्यास ओबीसीचे आरक्षण संपविण्यात येईल असा आरोप वचिंतचे देखरेख समितीचे प्रदेश प्रमुख अर्जुन सलगर यांनी येथे केला.ते पुढे म्हणाले जातनिहाय जनगणना झालेली नसताना राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसीचे आरक्षण नुकताच अध्यादेश काढून कमी केले व ओबीसी समाजाचा अवमान केला .
आगामी विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्य़ातील पाचही ही जागा वंचित आघाडी लढवणार आहे असे त्याने सांगितले .
www.konkantoday.com