
नगराध्यक्ष म्हणतात नागरिकांच्या आरोग्याची खबरदारी पालिकेने घेतली आहे
रत्नागिरी शहरातील नागरिकांचे आरोग्य उत्तम रहावे याची खबरदारी पालिकेने घेतली आहे अन्य कोणीही सांगण्याची गरज नाही असे प्रतिपादन रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी केले आहे .
दोन दिवसांपूर्वी नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या पालिका प्रशासनावर गुन्हा दाखल करावा अशी तक्रार अर्ज राजू किर व त्यांच्या सहकार्यानी शहर पोलीस स्थानकात केला होता त्यावर नगराध्यक्षांनी प्रतिक्रिया दिली .
रत्नागिरी नगर परिषदेची डास निर्मूलन मोहीम स्वतः नगरपालिका राबवित आहे. या वेळी हे काम खासगी एजन्सीला देण्यात आलेले नाही. यासाठी प्रत्येक प्रभागाला एक स्प्रेपंप दिला आहे आणि दोन फॉगिंग मशीन खरेदी केले आहेत. फवारणी झालेल्या भागात नागरिकांच्या सह्या सुद्धा घेतल्या जात आहेत .किर यांच्यावर टीका करताना नगराध्यक्ष साळवी म्हणाले कि किर यांनी खोडसाळ व्यक्तव्य करून सुजाण जनतेची फसवणूक करू नये .त्यांनी पालिकेत येऊन डास फवारणीची माहिती घ्यावी .निवडणुका जवळ आल्याने ते जागे झाले असल्याची टीकाही साळवी यांनी केली.
www.konkantoday.com